महात्मा गांधी आणि राखी सावंतच्या तुलनेवरून भडका; विधानसभा सभापतींचं स्पष्टीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 20, 2021

महात्मा गांधी आणि राखी सावंतच्या तुलनेवरून भडका; विधानसभा सभापतींचं स्पष्टीकरण

https://ift.tt/2XxVoZX
लखनऊ : विधानसभेचे सभापती यांनी रविवारी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होतेय. 'कुणी कमी कपडे परिधान केल्यामुळे महान झालं असतं तर बॉलिवूड कलाकार महात्मा गांधींहून महान झाली असती', असं वक्तव्य सभापती हृदयनारायण दीक्षित यांनी केलं होतं. उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघात 'प्रबुद्ध वर्ग संमेलना' दरम्यान दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यानंतर दीक्षित यांनी ट्विटरद्वारे आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. विधानसभा अध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानंतर दीक्षित यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढू नये, असं आवाहन त्यांनी केलंय. 'सोशल मीडियावर काही मित्र माझ्या एका भाषणातील व्हिडिओचा काही भाग वेगळ्या अर्थासहीत प्रसारित करत आहेत. वास्तवात उन्नावच्या प्रबुद्ध संमेलनातील माझ्या भाषणाचा हा अंश आहे. यामध्ये संमेलन संचालकांनी माझा परिचय करून देताना मला प्रबुद्ध लेखक म्हटलं होतं. काही पुस्तके आणि लेख लिहिल्यानं कुणीही प्रबुद्ध होत नाही. कमी कपडे परिधान करत होते. देशानं त्यांना बापू म्हटलं. परंतु, याचा अर्थ हा नाही की राखी सावंत देखील गांधी होऊ शकते', असं स्पष्टीकरण दीक्षित यांनी दिलंय.