मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. स्फोटकं प्रकरणात अटकेची टांगती तलवार असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एका प्रकरणाची खुली चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची खुली चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ( ) वाचा: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात आधीच एका प्रकरणात खुली चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आरोपावरून ही चौकशी केली जात आहे. निलंबित डांगे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणाची खुली चौकशी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मागणी केली होती. याबाबत प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्याने सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला खुली चौकशी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर यांच्याविरोधात कट रचणे, पुरावे नष्ट करणे, आणि अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा: