'या' कारणांसाठी तालिबानशी बोलणी सुरू ; पाकिस्तानची कबुली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 19, 2021

'या' कारणांसाठी तालिबानशी बोलणी सुरू ; पाकिस्तानची कबुली

https://ift.tt/3CtvxAT
इस्लामाबाद: ‘अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार यावे, यासााठी पाकिस्तानने तालिबानशी चर्चा करणे सुरू केले आहे,’ अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीटरवरून शनिवारी दिली. तसेच, अफगाणिस्तानच्या युद्धात अमेरिकेच्या बाजूने जाण्याची पाकिस्तानने मोठी किंमत मोजली असून, अमेरिकेच्या तेथून माघारी जाण्यानंतर पाकिस्तानला तेथील राजकारण्यांकडून आरोपी ठरविले जाते, त्याच्या वेदना होतात, असेही त्यांनी म्हटले आहे. रशियातील वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. शांघाय सहकार्य संघटनेची दुशांबे येथे नुकतीच बैठक झाली. त्यानंतर इम्रान खान यांनी तालिबानबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘दुशांबे येथे अफगाणिस्तानच्या शेजारी देशांबरोबर; विशेषत: ताजिकिस्तानच्या अध्यक्षांबरोबर सविस्तर चर्चा झाली. ताजिक, हजारा आणि उझबेक समुदायासह अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार बनावे, यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानशी बोलणी सुरू केली आहेत. अमेरिकेकडून पाकिस्तानचा वापर अमेरिकेचे दहशतवादविरोधी युद्ध पाकिस्तानसाठी घातक ठरल्याचे ते म्हणाले. अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील वीस वर्षांच्या वास्तव्यकाळात अमेरिकेसाठी पाकिस्तान म्हणजे भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंदुकीसारखा होता, असे ते म्हणाले. रशियातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘अमेरिकेच्या बाजूने जाण्याची फार मोटी किंमत पाकिस्तानने चुकती केली आहे. अमेरिकेची अफगाणिस्तानमधून अपयशी माघारीसाठी तेथील राजकारणी पाकिस्तानवर आरोप करतात, तेव्हा वेदना होतात.’