इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 20, 2021

इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

https://ift.tt/3tS0fkm
मुंबई : इंधन स्वस्त होण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सावध भूमिका घेतली आहे. आज सोमवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही इंधन दर सलग दोन आठवडे स्थिर आहेत. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजीला ब्रेक लागला. अमेरिकेत शुक्रवारी बाजार बंद होताना ब्रेंट क्रूडचा भाव ७५.३४ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७१.९७ डॉलरवर बंद झाला होता. आज ब्रेंट क्रूडचा भाव १३ सेंट्सने कमी झाला आणि तो ७५.३३ डॉलरपर्यंत खाली आला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २४ सेंट्सने कमी होऊन ७२.३७ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला आहे. अमेरिकेत चक्री वादळानंतर झालेल्या नुकसानीने तेल विहिरींना फटका बसला आहे. अजूनही तेथील कच्च्या तेलाचे उत्पादन पूर्ववत झालेले नाही. राज्यांनी केला विरोध जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत तूर्त पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास महाराष्ट्र ,केरळ या राज्यांनी विरोध दर्शवला होता. जीएसटी कक्षेत आल्यास राज्यांना मिळणारा इंधनावरील कर महसूल मोठ्या प्रमाणात कमी होईल, या भीतीने तूर्त पेट्रोल-डिझेलचा जीएसटी समावेश करू नये, अशी आग्रही भूमिका या राज्यांनी घेतली आहे.