नवी दिल्ली : आज (बुधवारी) सकाळी ११.०० वाजता अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. २६ सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांसोबत , , या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे. पाच दिवसांच्या आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान , कोविड ग्लोबल समिटमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रालाही ते संबोधित करतील. करोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून मोदींचा हा पहिलाच मोठा दौरा आहे. बायडन - मोदी भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या पदग्रहणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची अमेरिकेत प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. बायडन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना मोदी व त्यांच्यात बैठकी झाल्या होत्या. मोदी-बायडन यांच्या प्रत्यक्ष भेटीपूर्वी बायडन यांनी आयोजित केलेल्या करोना जागतिक परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. हॅरिस-मोदी गुरुवारी भेटणार अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये भेट होणार आहे. यावेळी दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये लोकशाही, मानवाधिकार आणि हवामान या मुद्द्यांचा समावेश असल्याचे व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. असा असेल पंतप्रधानांचा चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. पंतप्रधान बुधवारी सकाळी दिल्लीहून रवाना होऊन रात्री उशिरा वॉशिंग्टनला पोहोचतील. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक, व्हाइट हाऊसमध्ये क्वाड देशांच्या नेत्यांची शिखर परिषद, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांसोबत बैठकी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत चर्चा, अमेरिकी कंपन्यांचे सीईओ आणि उद्योगपतींसोबत बैठकी आणि २५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७६व्या आमसभेला संबोधन असं त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप आहे.
- २२ सप्टेंबर : अमेरिकेसाठी रवाना होणार
- २३ सप्टेंबर : अमेरिकेला दाखल होणार
- २३ सप्टेंबर : ऑस्ट्रेलिया, जपानच्या पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट
- २४ सप्टेंबर : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट
- २४ सप्टेंबर : पंतप्रधान मोदी क्वॉड बैठकीत सहभागी होणार
- २५ सप्टेंबर : यूएनजीएमध्ये पंतप्रधान मोदींचं संबोधन
- २६ सप्टेंबर : पंतप्रधान मोदी भारतात परतणार