'बाळाला दूध पाजू शकत नव्हते म्हणून लोक टोमणे मारायचे' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 7, 2021

'बाळाला दूध पाजू शकत नव्हते म्हणून लोक टोमणे मारायचे'

https://ift.tt/3tjeqOW
मुंबई- अभिनेत्री आणि सुयश राय यांच्या घरात नुकतंच एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव निर्वैर ठेवलं आहे. परंतु, गरोदरपणात आणि बाळाला जन्म दिल्यानंतरही तिला अनेकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागले, असा खुलासा किश्वरने केला आहे. किश्वर सुरुवातीपासून चाहत्यांना तिच्या गर्भावस्थेत होणाऱ्या बदलांबद्दल सांगत आली आहे. मुलाच्या जन्मानंतरही किश्वर चाहत्यांसोबत जोडलेली आहे. अशातच नवीन खुलासा करत किश्वरने सांगितलं की आई झाल्यानंतरही तिला लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागले. सी सेक्शन झाल्याने वाढल्या अडचणी किश्वरने गरोदरपणात अनुभवलेल्या अडचणींबद्दल सांगितलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत किश्वर म्हणाली, 'सीझर झाल्यानंतर माझ्या तब्येतीत सुधारणा आहे पण त्याचे परिमाण शरीरावर दिसू लागले आहेत. हे असं काही तरी होतं जे मी यापूर्वी कधीही अनुभवलं नाही. एका महिलेचं शरीर या नऊ महिन्यात खूप काही सहन करतं आणि सीझर झाल्यानंतर तर किती गोळ्या घ्याव्या लागतात. आई होणं म्हणजे रोलर कोस्टरवर बसण्यासारखं आहे. कधी मला खूप छान वाटतं, कधी खूप त्रास होतो, सगळ्या भावना एकाच वेळेस मनात येत असतात. पण जेव्हा मी माझ्या बाळाचा चेहरा बघते तेव्हा हे सगळं विसरून जाते.' दूध पाजू न शकल्याने ऐकावे लागले टोमणे आई झाल्यानंतरचा प्रवास सांगताना किश्वर म्हणाली, 'तुम्हाला तुमच्या मुलाला दूध द्यायचं असतं. मात्र पहिल्या तीन दिवसात तितकसं दूध येत नसल्याने मला खूप वाईट वाटायचं. त्यावर तुमच्या आसपास अशी माणसं असतात जी तुम्हाला त्यावरून टोमणे मारत असतात. मला लोक म्हणाले, बाळाला दूध पाजणं खूप गरजेचं आहे, असं कर, तसं कर. मग तुम्हालाच असं वाटायला लागतं की तुम्ही कुठेतरी कमी पडताय. लोकांना वाटतं की तुम्ही मुद्दाम बाळाला दूध देत नाहीत. त्यांचे टोमणे ऐकून मलाही वाईट वाटायचं पण असं वागणं योग्य नाहीये.'