विराट कोहलीचे वनडे संघाचे कर्णधारपद जाणार! नेतृत्व राखण्यासाठी... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

विराट कोहलीचे वनडे संघाचे कर्णधारपद जाणार! नेतृत्व राखण्यासाठी...

https://ift.tt/3CiYO17
नवी दिल्ली: कामाचा ताण आणि भविष्यातील योजना असे कारण विराट कोहलीने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्यासाठी दिले असले, तरी मागील काही दिवसांत पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता विराट कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधारपदही जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे पद टिकविण्यासाठी विराट कोहलीला टी-२० वर्ल्ड कपमध्ये चमक दाखवावी लागणार आहे. वाचा- २०२३च्या वर्ल्ड कपपर्यंत वनडे संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, २०२३पर्यंत वर्ल्ड कप वगळता भारतीय संघ केवळ २० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार आहे. मात्र, सारा खेळ आता टी-२० वर्ल्ड कप अवलंबून असेल. या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने चमक दाखविली नाही, तर कोहलीचे कर्णधारपद जाणारच होते. त्याआधीच त्याने कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून वन-डेचे कराटर्णधारपद वाचविल्याची चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, की संवाद साधता न येणे ही विराटबाबतची मोठी समस्या आहे. चर्चेसाठी महेंद्रसिंह धोनी खेळाडूंना चोवीस तास उपलब्ध असायचा. तेच काहीसे गुण रोहितमध्ये आहेत. तसाच विश्वास ज्युनियर खेळाडूंना रोहितबाबत वाटतो. वाचा- उपकर्णधारपदासाठी चुरस आगामी स्पर्धांमध्ये भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार कोण असेल, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यात ऋषभ पंत, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह यांची नावे चर्चेत आहेत. आयपीएलमध्ये पंत दिल्लीचे नेतृत्व करीत असून, लोकेश राहुल पंजाबचा कर्णधार आहे. वाचा- शास्त्रींना चाचणी आवश्यक नवी दिल्ली : कसोटी मालिकेतील अखेरच्या टप्प्यात करोनाची लागण झालेले भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा इंग्लंडमधील विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, त्यांना परतण्यासाठी 'फिट टू फ्लाय', चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. करोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अर्धवट राहिली. मालिकेतील अखेरचा मँचेस्टर कसोटी सामना करोनाच्या भीतीमुळे होऊ शकला नाही. शास्त्रींसह भरत अरुण आणि आर, श्रीधर यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर ज्युनियर फिजिओ योगेश परमार यांनाही करोनाची लागण झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या () एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की करोनातून सावरल्यानंतर शास्त्री, भरत अरुण आणि श्रीधर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. त्यांनी आपला विलगीकरणाचा कालावधीही पूर्ण केला आहे. मात्र, तेथील आरोग्य नियमांनुसार परतीच्या विमानात बसण्यापूर्वी त्यांचा सिटी स्कॅन स्कोअर हा ३८हून अधिक असायला हवा. तरच त्यांना फिट टू फ्लाय प्रमाणपत्र मिळेल. अर्थात, ते परतू शकतील. सर्व काही सुरळीत पार पडले तर येत्या दोन दिवसांत ते तेथून निघतील. आशा आहे, की त्यांचा सिटी स्कॅन स्कोअर व्यवस्थित येईल. सिटी स्कॅन स्कोअरवरून करोनाग्रस्तच्या व्यक्तीवर विषाणूच्या परिणामाबाबत माहिती मिळते. त्याच्या फुप्फुसावर किती संसर्ग झाला, याची माहिती मिळते. जास्त स्कोअर आल्यास त्यावरून सुधारणा झाल्याचे मानले जाते. दूरच्या विमानप्रवासासाठी सिटी स्कॅन स्कोअर ४० असायला हवा, असे मानले जाते.