जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद; अवजड वाहनांना बंदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 23, 2021

जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद; अवजड वाहनांना बंदी

https://ift.tt/39yed1r
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदरः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. यावेळी एकच मार्गिका सुरू राहणार असल्याने कोंडी टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी अधिसूचना जारी करत तीन दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत येणाऱ्या वर्सोवा पुलाची खड्डे व इतर कारणास्तव तत्काळ देखभाल, दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे आरआयबीच्या सूरत व दहिसर शाखेने पत्राद्वारे काशिमिरा वाहतूक विभागाला कळवले होते. या कामासाठी पुलावरील एक मार्गिका बेरिगेटिंग लावून बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत गुजरात व पालघरच्या दिशेने जाणाऱ्या एकाच मार्गिकेवरून अवजड व हलकी वाहने गेल्यास वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. तर अवजड वाहनांना २६ ते २८ सप्टेंबरपर्यंत पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही वाहतूक वळविण्यात येणार आहे. ठाण्याहून पालघरच्या दिशेने अवजड वाहने मुंब्रा-खारेगाव टोलनाका - मानकोली-भिवंडी वाडा-मनोरी, मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-भिवंडी-नदी नाका-अंबाडी-वज्रेश्वरी-गणेशपुरी-शिरसाट मार्गे जातील, मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजूर फाटा-कामन-चिंचोटीमार्गे वसई-विरार महापालिका हद्दीतून इच्छुकस्थळी जातील. ही अधिसूचना महसूल विभागाची वाहने, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने पोलिस विभाग तालुका दंडाधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सूरत यांनी परवानगी दिलेली वाहने या वाहनांना लागू राहणार नाही.