तालिबानने घेतला महिलांच्या आंदोलनाचा धसका, जारी केले 'हे' आदेश! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 9, 2021

तालिबानने घेतला महिलांच्या आंदोलनाचा धसका, जारी केले 'हे' आदेश!

https://ift.tt/396SEF7
काबूल: तालिबानने मागील महिन्यात अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली. त्यानंतर महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी काही चार-पाच महिलांनी सशस्त्र तालिबानींसमोर आंदोलन केले. या आंदोलनाची ठिणगी अफगाणिस्तानमध्ये पसरली. तालिबानविरोधात झालेल्या विविध आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला. काही ठिकाणी महिलांचे मोर्चेदेखील निघाले होते. जागतिक पातळीवर स्वत:ची प्रतिमा उजळ करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तालिबानने महिलांच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. तालिबानने आंदोलनासाठी नवीन आदेश जारी केले आहेत. तालिबानी सत्तेविरोधात आणि पाकिस्तानविरोधात मोठे आंदोलन झाले होते. मागील काही दिवसांपासून विविध मुद्यांवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्रस्त झाला आहे. आता तालिबान सरकारने नवीन आदेश काढले असून आंदोलन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. तालिबानने सातत्याने होणारे आंदोलने रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता आंदोलने, निदर्शने करण्यापूर्वी न्याय विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. स्थानिक वृत्तपत्र पझवोक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, परवानगी घेताना आंदोलनचा उद्देश्य, घोषणा, वेळ, स्थळ आणि इतरही माहिती द्यावी लागणार आहे. त्याशिवाय आंदोलनच्या २४ तास आधी सुरक्षा यंत्रणांनाही माहिती द्यावी लागणार आहे. तालिबानच्या या नियमांमुळे लोकांमध्ये रोष वाढण्याची शक्यता आहे. आंदोलक महिलांना मारहाण अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधातील आवाज दडपण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये अधिकारांसाठी आणि विविध मागण्यांसाठी महिलांनी आंदोलन पुकारले होते. एका ठिकाणी सुरू असलेला मोर्चा पांगवण्यासाठी तालिबानींनी हवेत गोळीबार केला. महिलांना मारहाणही करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.