भारताच्या ट्वेन्टी-२० संघ निवडीनंतर हा बसला सर्वात मोठा धक्का, चार वर्षांनंतर खेळाडूला मिळाली संधी... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 9, 2021

भारताच्या ट्वेन्टी-२० संघ निवडीनंतर हा बसला सर्वात मोठा धक्का, चार वर्षांनंतर खेळाडूला मिळाली संधी...

https://ift.tt/2VoSplh
नवी दिल्ली : बीसीसीआयने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आज संघ जाहीर केला. पण हा संघ जाहीर केल्यावर बऱ्याच जणांना एक मोठा धक्का बसला आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची घोषणा झाल्यावर एका खेळाडूच्या संघप्रवेशाने काही जणांना मोठा धक्का बसला. कारण गेल्या चार वर्षांपासून एक खेळाडू भारताच्या ट्वेन्टी-२० संघाबाहेर होता. पण विश्वचषकाच्या संघात मात्र त्याला स्थान दिल्याचे पाहायला मिळाले आहे. हा खेळाडू आहे भारताचा फिरकीपटू आर. अश्विन. गेल्या बऱ्याच कालावधीपासून अश्विन हा फक्त कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्याला भारताच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण यावेळी जाहीर केलेल्या संघात मात्र अश्विनला संधी देण्यात आली आहे. अश्विन हा बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघात नसला तरी त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. तो भारतासाठी ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळत नसला तरी तो आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सध्याच्या घडीला भारताकडे चांगला अनुभव असलेला फिरकीपटू दिसत नाही. त्यामुळे अश्विनची या संघात निवड करण्यात आली असल्याचे समजते आहे. कारण भारतीय संघात राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव नाही. त्याचबरोबर अश्विन हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्याचबरोबर महत्वाची षटकेही टाकू शकतो. त्यामुळे अश्विन हा विश्वचषकात भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. त्यामुळेच निवड समितीने अश्विनची निवड भारतीय संघात केली असावी, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी आता महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली आहे. धोनीला अश्विन हा कसा खेळाडू आहे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे धोनी अश्विनचा चांगला उपयोग विश्वचषकात करू शकतो. त्यामुळे अश्विनची निवड ही योग्य वाटत आहे. पण अश्विनला ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची किती संधी मिळते आणि तो या संधीचे कसे सोने करतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल यात शंकाच नाही.