मुंबईः मुंबईत ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. दिल्लीत २०१२ साली घडलेल्या 'निर्भया' प्रकरणाची आठवण देणारी क्रूर घटना आहे. याप्रकरणी भाजपनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरोपीनं एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर एक व्यक्ती महिलेला मारहाण करीत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या सुमारास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. वाचाः या क्रूर घटनेमुळं मुंबई हादरली आहे. तर अनेकांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. भाजपनंही या घटनेवर संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना एकून मन सुन्न झाले. कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. तसंच, महिलांवरील वाढते अत्याचार थांबवण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार?. दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वाचाः एक आरोपी पकडला गेलाय. मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत. कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सुबुद्धी द्यावी. महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषण करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं यांनी म्हटलं आहे.