'...तो योगी कसा', राहुल गांधींचा 'अब्बा जान'वरून CM आदित्यनाथांवर निशाणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

'...तो योगी कसा', राहुल गांधींचा 'अब्बा जान'वरून CM आदित्यनाथांवर निशाणा

https://ift.tt/3C6SkT0
नवी दिल्लीः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसं उत्तरेतील राजकारण तापू लागलं आहे. काँग्रेस नेते आणि खासदार यांनी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका करणारं एक ट्वीट केलं आहे. तर राहुल गांधींच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. 'जो नफ़रत करे, वो योगी कैसा!' असं ट्वीट राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींनी हे ट्वीट योगी आदित्यनाथ यांच्या 'अब्बा जान'वाल्या वक्तव्यावर केलं. यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या टीमनेही राहुल गांधींच्या टीकेला काही वेळात प्रत्युत्तर दिलं. राजकारणात कुणीच राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. आणि जो दंगेखोरांचा द्वेष करतो, भ्रष्टाचाऱ्यांचा तिरस्कार करतो, दहशतवाद्यांचा द्वेष करतो आणि देश आणि राज्याचे रक्षण करतो तोच योगी आहे. कदाचित हे तुम्हाला काँग्रेसच्या शाळेत शिकवलं गेलं नसेल, असा पलटवार भाजप नेते गौरव भाटिया यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर सडकून टीका केली. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केला होता. 'अब्बा जान म्हणणारे लोक २०१७ पूर्वी रेशन हडप करत होते', असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एका कार्यक्रमात केलं होतं. 'कारण त्यावेळी 'अब्बा जान' म्हणणारे लोक रेशन हडप करत होते. कुशीनगरचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशात जात होते. पण आता जो कोणी गरीबांचे रेशन खाईल, त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल', असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. 'मुख्यमंत्रीपदावर असल्याने योगी आदित्यनाथ यांना अशाप्रकारची असभ्या भाषा शोभत नाही. आणि ते कमी शिक्षित असल्याचं दिसून येतं. कारण जे उच्च शिक्षित आहेत ते योग्य आणि सन्मानजनक भाषेचा उपयोग करतात. एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला अशी भाषा वापरण्यापासून दूर राहिले पाहिजे. अशा भाषेचा वापर हा लोकशाहीसाठीही वाईट आहे', असं समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा म्हणाले.