'जौनपूर पॅटर्न' टीकेवरून भाजप आमदाराचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

'जौनपूर पॅटर्न' टीकेवरून भाजप आमदाराचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

https://ift.tt/3lofRrS
जौनपूरः मुंबईत १० सप्टेंबरला साकीनाक्यामध्ये एका ३२ वर्षीय महिलेवर बालत्कार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झाली होती. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये राहणाऱ्या मोहन चौहान या नराधमाला १२ सप्टेंबरला अटक केली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून सोमवारी यावरून टीका केली गेली. 'जौनपूर पॅटर्न'ने घाण केली, असं सेनेनं म्हटलं. आता यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झालं आहे. 'सामना'मध्ये छापलेल्या या लेखानंतर उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या बदलापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार रमेश मिश्रा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. तर मुलाशी आपला काहीही संबंध नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली पाहिजे, असं आरोपीचे वडील म्हणाले. साकीनाक्यातील घटनेचा आरोपी यूपीतील जौनपूरचा साकीनाक्यात महिलेवर बलात्कार आणि त्यानंतर तिच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोहन चौहान याला अटक केली होती. आरोपी मोहन चौहान हा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातला राहणारा आहे. यानंतर 'सामना'मधून शिवसेनेने टीका केली होती. 'जौनपूर पॅटर्न'ने मुंबईत घाण केली आहे, असं लिहिलं होतं. भाजप आमदाराचे शिवसेनेला प्रत्युत्तर पीडितेच्या कुटुंबीयांशी आपल्या संवेदना आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. पण ज्याप्रकारे शिवसेनेने 'सामना'मध्ये लिहिले आहे, हे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण आहे. आरोपीच्या जिल्ह्याच्या नावाने संपूर्ण जिल्ह्याला बदनाम करणं निषेधार्ह आहे. जौनपूरमधूनच सर्वाधक IAS आणि IPS होतात, असं भाजप आमदार रमेश मिश्रा म्हणाले. ' ठाकरे सरकारचा अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न' महाराष्ट्र सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वचा झेंडा उंच केला. पण मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी त्यांचा मुलगा ( उद्धव ठाकरे ) मात्र अतिशय खालच्या पातळीचं राजकारण करत आहे. मुंबईच्या विकासात जौनपूरमधील अनेक नागरिकांचे योगदान आहे, असं मिश्रा म्हणाले. जौनपूरच्या राहणाऱ्या अनेक उद्योगपतींनी मुंबईच्या विकासाला हातभार लावला आहे. कृपाशंकर सिंह हे जौनपूरचे आहेत. ते महाराष्ट्र सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. जे अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, त्यांना जौनपूरबाबत फारशी माहिती नाहीए, असं रमेश मिश्रा म्हणाले.