
लंडन: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताने ३ बाद २७० धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे सध्या १७१ धावांची आघाडी असून मैदनात कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजा खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर आणि चेतेश्वर पुजार यांनी शतकी भागिदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. वाचा- तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या ४३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी धावफलक हलता ठेवला. जेम्स एडरसनने राहुलला ४६ धावांवर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागिदारी केली. दरम्यान रोहितने कसोटी करिअरमधील आठवे शतक पूर्ण केले. त्याने मोईन अलीला षटकार ठोकत १०० धावा पूर्ण केल्या. रोहितच्या शतकपाठोपाठ पुजारने अर्धशतक केले. वाचा- भारताची ही जोडी मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाईल असे वाटत असताना रोहित १२७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ पुजारा देखील ६१ धावांवर माघारी परतला. पुजारा बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या ऐवजी पुन्हा एकदा रविंद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. वाचा- वाचा- दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला तेव्हा भारताने ३ बाद २७० धावा केल्या होत्या. भारताकडे १७१ धावांची आघाडी असून कर्णधार विराट कोहली २२ तर जडेजा ९ धावांवर नाबाद होते.