नवी दिल्लीः केंद्र सरकारने भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत ( ) वाढवली आहे. करोना संसर्गामुळे आधी सरकारने आयकर भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. सीबीडीटीने वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तीकर परतावा आणि ऑडिटची वेगवेगळी रिपोर्ट दाखल करण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे. आयकर कायदा, १९६१ नुसार २०२१-२२ साठी प्राप्तीकर परतावा आणि ऑडिटचे वेगवेगळे रिपोर्ट दाखल करण्यास करदात्यांना आणि इतरांना रिपोर्ट दाखल करण्यास समस्या येत आहेत. यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तीकर रिटर्न आणि ऑडिटसह विविध रिपोर्ट्स दाखल करण्यास नियोजित तारखांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०२१-२२ साठी उत्पन्नाचं विवरण दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम तारीख ही ३१ जुलै २०२१ ही होती. ती वाढवून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत केली गेली होती. आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा घरगुती व्यवहारात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींकडून लेखापालकडून अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख ही ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही तारीक ३१ ऑक्टोबर २०२१ वरून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती.