स्पेसएक्सची 'Inspiration 4' मोहीम फत्ते! चारही अंतराळ पर्यटक सुखरूप परतले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 19, 2021

स्पेसएक्सची 'Inspiration 4' मोहीम फत्ते! चारही अंतराळ पर्यटक सुखरूप परतले

https://ift.tt/3kjy4aS
वॉशिंग्टन: अमेरिकन उद्योजक यांची कंपनी स्पेस एक्सची पहिली मोहीम यशस्वी ठरली आहे. या अंतराळ पर्यटन मोहिमेतील चारही जण सुखरुपपणे पृथ्वीवर परतले. या अंतराळ पर्यटन मोहिमेत एकही अंतराळवीर नव्हता. सामान्य नागरिकांना पहिल्यांदाच अंतराळात पाठवण्यात आले होते. तीन दिवसांच्या अंतराळ पर्यटनानंतर चारही क्रू सकाळच्या सुमारास फ्लोरिडाजवळील अटलांटिक समुद्रात उतरले. चारही जण सुखरूप आहेत. स्पेसएक्सने या मोहिमेला 'Inspiration 4' असे नाव दिले होते. या मोहिमेतंर्गत १६ सप्टेंबर रोजी चार अंतराळ प्रवासी ड्रॅगन कॅप्सूलद्वारे अंतराळात रवाना झाले होते. अंतराळात प्रवास करणाऱ्या चारही प्रवाशांपैकी एकही जण अंतराळवीर नव्हता. हे सर्वजण सामान्य नागरिक होते. पहिल्यांदाच अंतराळात अंतराळवीरांशिवाय संपूर्ण क्रू अंतराळात गेला होता. 'Inspiration 4' क्रूचा अंतराळ यान उड्डाणात कोणताही सहभाग नव्हता. ही मोहीम पृ्थ्वीवरून संचलित करण्यात आली होती. 'Inspiration 4' मधील चारही प्रवाशांनी फ्लोरिडामधून अंतराळात उड्डाण घेतले होते. त्यानंतर तीन दिवसानंतर फ्लोरिडामध्येच अटलांटिक महासागरात स्थानिक वेळ सकाळी सात वाजता लँडिंग केले. या अंतराळ पर्यटकांसाठी समुद्रात स्पेसएक्सची नाव उभी होती. कॅप्सूल लँड झाल्यानंतर जवळपास एक तासानंतर चारही प्रवासी बाहेर आले. या अंतराळ पर्यटकांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून १६० किमी उंचावर तीन दिवस अंतराळात वास्तव्य केले. या अंतराळ प्रवाशांमध्ये जेयर्ड आयजॅकमॅन (३८ वर्ष), सियान प्रॉक्टर (५१ वर्ष), हेइली एक्रेनेऑक्स (२९ वर्ष) आणि क्रिस सेम्ब्रोस्की (४२ वर्ष) आदींचा समावेश होता. या अंतराळ पर्यटनाचा खर्च जेयर्ड आयजॅकमॅन यांनी केला. आयजॅकमॅन हे ई-कॉमर्स कंपनीचे सीईओ आहेत. या प्रवासासाठी किती खर्च आला याची माहिती अद्याप समोर आली नाही.