
नवी दिल्लीः टोकिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळांडूची शानदार कामगरी सुरू आहे. भारताने १९ वं पदक ( ) जिंकलं आहे. बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरने ही १९ वे पदक जिंकून दिले आहे. कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकले आहे. टोकिया पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तीक खेळात हे ५ वे सुवर्णपदक आहे. यासोबतच त्याने इतिहासही रचला आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून कृष्णा नागरचं अभिनंदन केलं आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष बॅडमिंटमध्ये SH6 स्पर्धेत कृष्णा नागरने हाँगकाँगच्या काई मान चू याचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या पहिल्या सेट कृष्णाने २१-१७ असा जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये काई मान चू ने पुनरागमन करत २१-१६ ने दुसरा सेट जिंकला. पण यानंतर कृष्णाने आक्रमक खेळी करत पुनरागमन केलं. तिसरा सेट २१-१७ असा जिंकला. २-१ ने सामना जिंकत सुवर्णपद पटकावले. टोकियोतील पॅरालिम्पिक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे. भारातने आतपर्यंत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कास्य पदक जिंकले आहेत. भारताने आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये फक्त १२ पदकं जिंकली होती. पण या स्पर्धेत आतापर्यंत १९ पदकं जिंकत भारताने इतिहास रचला आहे. राजस्थानचा कृष्णा नागर हा केवळ २२ वर्षांचा आहे. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी त्याने जागतिक चॅम्पियन्स स्पर्धेत रौप्य आणि कास्य पदक जिंकले आहे. याशिवाय पॅरा एशियन गेम्समध्येही त्याने कास्य पदक जिंकले आहे. आपल्या गटात तो सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याची शानदार कामगिरी पाहता तो अव्वल स्थान मिळवू शकतो. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कृष्णाचे अभिनंदन केले आहे. राजस्थानचा पॅरा बॅडमिंटन पटू कृष्णा नागरने पुरुषांच्या SH6 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. एका शानदार विजय कामगिरी केली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. शानदार यशाबद्दल त्यांचे खूपखूप अभिनंदन, असं गहलोत यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.