समीर वानखेडेंच्या बाजूने देवेंद्र फडणवीसही मैदानात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 27, 2021

समीर वानखेडेंच्या बाजूने देवेंद्र फडणवीसही मैदानात

https://ift.tt/3mhZQ8I
म. टा. विशेष प्रतिनिधी, 'एखादा अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणे हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडे यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला. कुणावरही विशिष्ट हेतूने आरोप करणे योग्य नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते यांनी अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्या आरोपांना मंगळवारी उत्तर दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली असून, त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच हा खटाटोप असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबई क्रूझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा त्यात समावेश आहे. याबाबत फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकार व मलिक यांना लक्ष्य केले. एनसीबीचा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? एनसीबीची सर्व कारवाई अमली पदार्थ प्रकरणात होते. मग सगळ्या ड्रग्जमाफियांसाठी तुम्ही बॅटिंग करीत आहात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात एक हजार कोटींची दलाली होते त्यावर हे नेते गप्प का, सॉफ्टवेअरने वसुली होते त्यावर ते का बोलत नाहीत, गृहमंत्री फरार आहेत त्यावर हे भाष्य का करत नाहीत, संजय राऊत, नवाब मलिक एकदा तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले का, अशा प्रश्नांची सरबत्तीच फडणवीस यांनी केली.