परमबीर सिंह यांचा पगार थांबवला; निलंबनासंदर्भातही सरकारच्या हालचाली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 27, 2021

परमबीर सिंह यांचा पगार थांबवला; निलंबनासंदर्भातही सरकारच्या हालचाली

https://ift.tt/3GmBfrc
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईचे माजी पोलिस महासंचालक यांना फरार घोषित करण्यासाठी राज्य सरकारने पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर आता त्यांचा पगार थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सेवेत दाखल न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भातही राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगण्यात आले. परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती दाखल केली होती. या समितीने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकवेळा नोटीस पाठवूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे ते इतर देशात पळून गेल्याचे बोलले जात आहे. परिणामी त्यांना फरार घोषित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. यात परमबीर यांच्यासह २५ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निवेदन देण्यात आल्याचे कळते. मात्र गृह मंत्रालयाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेला आरोप विस्तृत स्वरूपात देण्यास पोलिस महासंचालकांना कळविले असल्याचे समोर येत आहे. परमबीर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते जूनपासून कोणतीही सबब न देता गैरहजर राहिले आहे. त्यामुळे त्यांचे जुलैपर्यंतचे वेतन कोषागार कार्यालयाकडून काढण्यात आले. परमबीर यांची कार्यालयातील उपस्थिती किंवा वैद्यकीय रजा याविषयी कोषागार कार्यालयाला कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे गृहरक्षक दलाकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडूनही माहिती मिळाली नाही. त्यामुळे गृह विभागाने त्यासंदर्भात महासंचालकांना कळवले असून, पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांचे वेतन रोखण्यात आल्याचे सांगण्यात येते.