मुंबई/पुणे : जर तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना स्वस्त घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा मालमत्तांचा करणार आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. डिफॉल्टच्या सूचीमध्ये आलेली ही मालमत्ता आहे. याविषयीची माहिती IBAPI (इंडियन बँक्स ऑक्शन्स मॉर्गेज्ड प्रॉपर्टीज इन्फॉर्मेशन) ने दिली आहे. बँक ऑफ बडोदा ज्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे, त्यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे. लिलाव कधी होणार? बँक ऑफ बडोदा (BOB)ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मेगा ई-लिलाव ८ ऑक्टोबर २०२१ रोजी केला जाणार आहे. यावेळी निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाईल. तुम्ही येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता. नोंदणी कुठे करायची? इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी https://ibapi.in/ e Bkray पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' वर क्लिक केल्यानंतर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी द्वारे नोंदणी करावी लागेल. केवायसी दस्तऐवज आवश्यक बोलीदाराला आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे केवायसी दस्तऐवजांची पडताळणी केली जाईल. या कामी २ दिवसांचा कालावधी लागू शकतो. बँक वेळोवेळी करते लिलाव मालमत्तेच्या मालकांनी बँकेच्या कर्जाची परतफेड केली नाही. किंवा काही कारणास्तव देऊ शकले नाही. अशा सर्व लोकांच्या जमिनी बँकेने ताब्यात घेतल्या आहेत. अशा मालमत्तांचा वेळोवेळी बँकेकडून लिलाव केला जातो. बँक या लिलावात सदर मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.