टाटांच्या नावाने मेसेज व्हायरल; बनावट मेसेजबाबत टाटा समूहाने केलं हे आवाहन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 3, 2021

टाटांच्या नावाने मेसेज व्हायरल; बनावट मेसेजबाबत टाटा समूहाने केलं हे आवाहन

https://ift.tt/3isHWxL
पुणे : टाटा समूहाच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने एक ट्विट करत लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, टाटा समूह किंवा त्यांची कोणतीही कंपनी अशा प्रकारे कोणतीही प्रचारात्मक क्रिया (प्रमोशनल अॅक्टिव्हिटी) करत नाही. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशाच्या जाळ्यात अडकणं टाळा आणि असे संदेश लोकांनाही फॉरवर्ड करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एका प्रचारात्मक संदेशात दावा केला जात आहे की, टाटा समूहाची १५० वर्षे साजरी करण्यासाठी कंपनीकडून एक सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना टाटा नेक्सॉन ईव्ही हे चारचाकी वाहन मिळेल. व्हायरल होणाऱ्या या संदेशाबद्दल टाटा समूहाने इशारा दिला की, आम्ही अशाप्रकारचा कोणताही प्रचारात्मक उपक्रम आयोजित केला नाही. त्यामुळे बनावट संदेशांपासून सावध राहा. लिंकवर क्लिक करण्यापूर्वी करा पडताळणी टाटा समूहाने आपल्या अपीलमध्ये म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा असे संदेश येतात, तेव्हा सर्वप्रथम त्याचा स्रोत काय आहे तो शोधा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संदेश अनेकवेळा वाचा. जर टाटा समूहाशी संबंधित कोणताही दावा केला जात असेल, तर त्याची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत तिथे जा आणि खरं काय ते शोधा. बनावट संदेश करू नका फॉरवर्ड या व्यतिरिक्त, संदेशात दिल्या जाणारी यूआरएल (URL) पाहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, जर तुम्ही त्याची URL पाहिली, तर ती नकली आहे की खरी ते कळेल. जर तुम्हाला वाटत असेल की, हा एक बनावट संदेश आहे आणि त्यातून फसवणूक होऊ शकते, तर असा संदेश कोणालाही पाठवू नका.