वानखेडे प्रकरण: मुख्यमंत्री ठाकरे लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 27, 2021

वानखेडे प्रकरण: मुख्यमंत्री ठाकरे लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र

https://ift.tt/3nv4Zto
मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर () एनसीबीने () छापेमारे केल्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक () यांच्यावर राज्याचे अलंपसंख्याक मंत्री (Nawab Malik) सतत आरोप करत आहेत. तसेच या प्रकरणात पंच प्रभाकर साईल () यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी () आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walde Patil) यांची भेट घेऊन चर्चा केली. आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. (cm thackeray to write letter to pm modi on wankhede case says ) क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर मलिक यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्याला दिल्याचे मलिक म्हणाले. या प्रकरणी कारवाई होणार असून ही कारवाई व्यक्ती विरुद्ध नसून घटनेवर आधारित असेल आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल असे मलिक म्हणाले. यावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. क्लिक करा आणि वाचा- परभणी नांदेड जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना या प्रकरणाशी संबंधित काही घडामोडी झाल्या. यादरम्यान एका पंचाने सर्व प्रकार समोर आणलेले आहेत. यानंतर मी जे आरोप करत होतो त्यात भर घालणाऱ्याच या गोष्टी होत्या हे स्पष्ट झाले आहे. आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी आपण केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-