
मुंबई: प्रकरणातील एक पंच साक्षीदार याने प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करत त्यातून खळबळजनक आरोप केले आहेत. यात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांचे नाव साईल याने घेतले आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीच्या दक्षता विभागाचे पथक बुधवारी मुंबईत येत आहे. यावेळी वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असून साईल याला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ( ) वाचा: क्रूझ ड्रग्ज पार्टीतील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याला समन्स बजावण्यात आले आहे. त्याला बुधवारी एनसीबी मुंबई कार्यालय येथे बोलावण्यात आले आहे. त्याने जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्याबाबत एनसीबीचे दिल्लीहून येणारे पथक चौकशी करणार आहे व त्याअनुषंगाने त्याला प्रश्न विचारले जाणार आहेत, असे एनसीबीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. वाचा: एनसीबीचे उपमहासंचालक यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय पथक बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत दाखल होईल, असेही सांगण्यात आले. सिंह हे मंगळवारीच मुंबईत दाखल झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याचा त्यांनी इन्कार केला. मी बुधवारी मुंबईत जात आहे. चौकशीच्या अनुषंगाने मी कुणालाही फोन केलेला नाही, असे सिंह यांनी नमूद केले. मुख्य म्हणजे वानखेडे यांनी मंगळवारी एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांची दिल्ली मुख्यालयात भेट घेतली. त्याचवेळी ज्ञानेश्वर सिंह हे कार्यालयातून निघाले. सिंह आणि वानखेडे यांची भेट झाली नाही. वाचा: दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रभाकर साईल हा एक स्वतंत्र पंच साक्षीदार आहे. त्याचं प्रतिज्ञापत्र व्हायरल झालं असून त्यात त्याने गंभीर आरोप केले आहेत. याला सोडण्यासाठी शाहरुख खान याच्या मॅनेजरकडे २५ कोटींची मागणी करण्यात आली. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. याबाबत किरण गोसावी आणि सॅम डिसुझा यांच्यात झालेले संभाषण मी ऐकले आहे, असा दावा साईल याने केला आहे. एनसीबी कार्यालयात ९ ते १० कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेण्यात आल्याचाही साईल याचा आरोप आहे. याबाबतच एनसीबीचा दक्षता विभाग चौकशी करणार आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास हाताळणारे समीर वानखेडे आणि पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांची समोरासमोर चौकशी केली जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. वाचा: