२६ ऑक्टोबरला मुंबईतील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 22, 2021

२६ ऑक्टोबरला मुंबईतील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

https://ift.tt/3jq1EdE
म. टा. प्रतिनिधी, भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष पंपिग स्टेशनमध्ये १२०० मिमी व्यासाच्या दोन झडपा बदलण्याचे तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या पंपिग स्टेशनमधील एक नादुरुस्त पंप बदलण्याच्या कामामुळे २६ ऑक्टोबर रोजी शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरात सुमारे १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याशिवाय पवई येथे १८०० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम करण्यात येणार असल्याने दादर, वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व आणि भांडुप भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २६ ऑक्टोबर सकाळी १० ते २७ ऑक्टोबर सकाळी १०पर्यंत बंद भांडुप एस विभाग : २४ तास बंद फिल्टरपाडा, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा अंधेरी के/पूर्व विभाग : दुपारी २ ते सायंकाळी ५.३० पर्यंत मरोळ, चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर अंधेरी के/पूर्व विभाग : दुपारी २ ते सायंकाळी ५.३० सहार रोड क्षेत्र, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत के/पूर्व विभाग : पहाटे ४ ते सकाळी ८पर्यंत ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाइपलाइन क्षेत्र) के/पूर्व विभाग : सकाळी ११ ते दुपारी २ मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज के/पूर्व विभाग : सायंकाळी ६ ते रात्री १० विजय नगर मरोळ, मिलिट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा के/पूर्व विभाग सिप्झ : २४ तास तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास बंद वांद्रे एच/पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनल पुरवठा क्षेत्र दादर जी/उत्तर विभाग : दुपारी ४ ते रात्री ९ धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार मार्ग जी/उत्तर विभाग : पहाटे ४ ते दुपारी १२ प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग