मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रुझवरील कारवाईनंतर IRCTCने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 28, 2021

मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रुझवरील कारवाईनंतर IRCTCने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

https://ift.tt/3bnhp0w
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रुझवर ड्रग्जप्रकरणी एनसीबीची छापेमारी झाल्यानंतर इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशनने () अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. क्रुझप्रकरणी सध्या वातावरण तापलेले असल्याने तूर्तास अधिकृत संकेतस्थळावरून क्रुझसाठीचे आरक्षण बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट क्रुझ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आयआरसीटीसी आणि कॉर्डेलिया क्रुझ यांच्यात करारदेखील करण्यात आला होता. त्यानुसार आरक्षण प्रचार-प्रसारासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मुंबई-गोवा क्रुझ टूरची माहिती ट्वीट करण्यात आली होती. दिवाळी पर्यटन आणि सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरसाठी आरक्षण खुले करण्यात आले होते. १७ सप्टेंबरपासून आयआरसीटीसीने अधिकृत संकेतस्थळावरून क्रुझचे आरक्षण सुरू केले होते. ३० सप्टेंबरपर्यंत आयआरसीटीसीच्या माध्यमाने या क्रुझसाठी अडीचशेहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले. एनसीबीच्या छापेमारीनंतर तूर्तास या क्रुझचे आरक्षण स्थगित करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे, असे आयआरसीटीसीच्या दिल्लीस्थित कॉर्पोरेट कार्यालयीतील अधिकारी आनंद झा यांनी सांगितले. वेगाने होत असलेले लसीकरण आणि करोनाची ओसरलेली लाट लक्षात घेता पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमाने रेल्वे, विमान, बस या सर्वच वाहतूकीच्या साधनांचे आरक्षण केले जाते. देशांतर्गत क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी आयआरटीसीने क्रुझ आरक्षण देखील नुकतेच सुरू केले होते. मुंबई-गोवासह, मुंबई-लक्षद्वीप, मुंबई-कोची, मुंबई-केरळ अशा क्रुझ प्रवासासाठी आरक्षण प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत होते.