पुणे: आणि यांना महाराष्ट्र विधानपरिषदेवर जाण्याची संधी पुन्हा का दिली जात नाही, असा सवाल आज पत्रकारांनी केला असता प्रदेशाध्यक्ष यांनी अत्यंत सूचक असं उत्तर दिलं आहे. संघटनात्मक जबाबदारी आणि निवडणुकीत संधी यात समतोल साधून पक्ष कसा पुढे जात असतो, हे सांगताना त्यांनी पंकजा व तावडे यांच्याबाबत सकारात्मक विधान केले. ( ) वाचा: विनोद तावडे यांची आजच भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने तावडे यांचे तब्बल दोन वर्षानंतर राजकीय पुनर्वसन झाले आहे. तावडे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीतही त्यांना संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या यांच्याबाबतही असंच घडलं. दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली गेली नाही. त्यामुळे अनेक मार्गांनी या नेत्यांची नाराजी व्यक्त होत होती. आता मात्र, एकेका नेत्याचे पुनर्वसन सुरू झाले असून बावनकुळे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली गेली आहे तर तावडेंनाही पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरच चंद्रकांत पाटील यांनी मतप्रदर्शन केले. वाचा: पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना विधानपरिषदेवर संधी का दिली जात नाही, असे विचारले असता बावनकुळे यांना दोन वर्षानंतर प्रतिनिधित्व मिळालं आहे. तसंच पंकजा आणि तावडे यांनाही मिळेल. या वर्षभरात खूप स्कोप आहे, असे विधान पाटील यांनी केले. आम्ही सगळेच संघटनात्मक जबाबदारी आणि निवडणुकीतील संधी यात संघटनेची जबाबदारी जास्त महत्त्वाची मानतो. त्यामुळे तावडे यांना अखिल भारतीय सरचिटणीसपदाची मिळालेली जबाबदारी इतकी मोठी आहे की त्यापुढे त्यांचे दोन वर्षापूर्वी तिकीट कापले गेले हा विषय मागे पडतो, असे पाटील म्हणाले. तावडे यांना पक्षात मिळालेली बढती हा माझ्यादृष्टीने व्यक्तिगत आनंदाचा विषय आहे. जे संयम आणि निष्ठा ठेवतात, संधी हुकली तरी पक्षाविरोधात रिअॅक्ट होत नाहीत त्यांना एक ना एक दिवस संधी ही मिळतेच आणि ती आधीपेक्षा मोठी संधी असते, हे तावडे यांच्याबाबतीत घडलेले आहे, असेही पाटील म्हणाले. वाचा: