'गोकुळ'च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; दूध भेसळ टाळण्यासाठी संघाने घेतला मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 17, 2021

'गोकुळ'च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; दूध भेसळ टाळण्यासाठी संघाने घेतला मोठा निर्णय

https://ift.tt/3kHM1PC
: दूध भेसळ रोखण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या वतीने नवीन सेक्युरिटी पॉलिफिल्म पिशवीतून दूध वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सेक्युरिटी पॉलिफिल्म पिशवीतून दूध विक्रीचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुंबईत झाला. ( News) 'गोकुळ'चं दूध आतापर्यंत पॉलिपिक पिशवीतून वितरित होत असे. ही पिशवी तीन लेअर्स किंवा पडदे असलेली होती. त्यामुळे त्यात भेसळ करणं शक्य होतं. पण आता 'गोकुळ'ने महत्त्वाचा निर्णय घेत हे पॅकिंग बदलायचं ठरवलं. आता 'गोकुळ'चं दूध ग्राहकांपर्यंत नव्या पॅकिंगमध्ये पोहोचणार आहे. या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे यात पाच लेअर्स असतील. त्यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. तरीही कोणी तसा प्रयत्न केला, तरी वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंगमुळे ग्राहकांनाच ते सहज लक्षात येईल, असा दावा 'गोकुळ'कडून करण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष काय म्हणाले? मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, गोकुळ या नावाची विश्वासार्हता खूप मोठी आहे. मुंबईत सुरवातीपासून ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादन देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. याच प्रयत्नातून आम्ही ग्राहकांना भेसळमुक्त दुध देण्यासाठी ‘गोकुळ’ चे पॅकिंग सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्राहकांकडून जादा रक्कम आकारली जाणार नाही. यावेळी गायक अवधूत गुप्ते, कलाकार माधवी निमकर, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते. ग्राहकांनी भेसळ कशी ओळखावी? गोकुळ व्यवस्थापनाकडून फूलक्रीम दुधासाठी सी.आय. छपाई तंत्रज्ञानाची पाच लेअर सिक्युरिटी फिल्म वापरली जात आहे. अधिक सुरक्षितता म्हणून या फिल्मवर बारीक अक्षरात छपाई करुन आतील भागाला निळ्या रंगाच्या फिल्मचा थर दिलेला आहे. त्यामुळे जर कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास सील केलेल्या जागी काळसर ठिपका दिसतो. त्यामुळे ग्राहकांना भेसळ ओळखता येईल, असं 'गोकुळ'कडून सांगण्यात आलं आहे.