
मुंबईः शासकीय सेवेत विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनास पंधरा दिवस उलटले आहेत मात्र, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाहीये. मात्र, आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात एसटीचे प्रवासी अधिक आहेत. अशातच एसटी बंद असल्यामुळं प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, आता एसटीचे थांबलेले चाक पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि संपकरी यांच्यात झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच दोन्हीकडून चर्चेसाठी पुढचं पाऊल टाकण्यात आलं आहे. वाचाः एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसंच, याबाबत एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री यांनी दिली आहे. संघटनेला दोन-तीन पर्याय दिले आहेत. अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला, तर त्यानंतरही पगारवाढ दिली जाईल, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. तसंच, आज ११ वाजता एसटी कर्मचाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. वाचाः