भदोहीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन रद्द करत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकार कृषी कायदे पुन्हा आणू शकते, असे या घोषणेनंतर उन्नावचे खासदार म्हणाले साक्षी महाराज म्हणाले. साक्षी महाराज यांच्यानंतर आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनीही वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकार कृषीविषयक कायदे पुन्हा लागू करू शकते, असे राज्यपाल मिश्र म्हणाले. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या केलेली घोषणा म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे हे विधेयक पुन्हा येऊ शकते, असे कलराज मिश्र म्हणाले. 'सकारात्मक पाऊल' कलराज मिश्र उत्तर प्रदेशातील भदोही येथे पोहोचले होते. 'तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा हे सकारात्मक दिशेने टाकलेले पाऊल आहे. साहसाने आणि धाडसाने कायदे रद्द करण्याचे कृती कौतुकास्पद आहे, असे पत्रकारांशी संवाद साधताना कलराज मिश्र म्हणाले. 'शेतकऱ्यांचे हित होते पण ते समजावून सांगता आले नाही' 'हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी केले होते. पण सरकार शेतकऱ्यांना समजावून सांगू शकले नाही. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यामुळे देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. ती आता संपणार आहे, असे ते पुढे म्हणाले. 'कायदे मागे घेण्यावर शेतकरी ठाम होते' शेतकरी आंदोलन करत आहेत. ते कृषी कायदे मागे घेण्यावर ठाम होते. शेवटी सरकारने हे कायदे मागे घेतले. पुढे जाऊन या प्रकरणी कायदा करण्याची गरज भासल्यास कायदा केला जाईल, असे वक्तव्य राज्यपाल मिश्र यांनी केले.