देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर; हिंसाचारातील जखमींची भेट घेणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 21, 2021

देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर; हिंसाचारातील जखमींची भेट घेणार

https://ift.tt/3HyQT3g
अमरावतीः त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज रविवारी अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल होणार. देवेंद्र फडणवीस पोलीस आयुक्त व व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. १२ व १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड सुद्धा झाली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती शहरातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याच घटनेचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती शहरात दाखल होणार आहेत. तसंच, देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. वाचाः मिळालेली माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे शहरातील काही भागांचा दौरा करणार आहेत. तर, दुपारी साडेबाराच्या सुमारास सर्किट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा करणार आहेत. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीसुद्धा अमरावती दौरा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी त्यांना अमरावती हद्दीत येण्यावर निर्बंध लावले होते. संचारबंदी नंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आखण्यात आला आहे. वाचाः