करोनाची वळवळ सुरूच! मुंबईतील २८१ जणांमध्ये आढळला सौम्य स्वरूपातील 'डेल्टा' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 13, 2021

करोनाची वळवळ सुरूच! मुंबईतील २८१ जणांमध्ये आढळला सौम्य स्वरूपातील 'डेल्टा'

https://ift.tt/3wJt4k9
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरांना भयाच्या छायेखाली ठेवणाऱ्या करोनाच्या बदलत्या स्वरूपाचा नेमका अभ्यास करण्यासाठी पालिकेकडून जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केल्या जात आहेत. चौथ्या टप्प्यातील २८१ चाचण्यांमध्ये सौम्य स्वरूपातील डेल्टा आढळला आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात होणाऱ्या या चाचण्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे ७५ टक्के आणि डेल्टा डेरिव्हेटिव्हचे २५ टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबई पालिकेने करोनाच्या बदलत्या स्वरूपाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगचा आधार घेतला आहे. देशभरात मोजक्याच शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या चाचण्यांमध्ये लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू ओढविला असून, लस घेतलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी, जिनोम सिक्वेन्सिंग अहवालातील निष्कर्षांनुसार या दोन्ही प्रकारातील करोनाचा विषाणू हा सौम्य स्वरूपाचा आहे. त्याचप्रमाणे डेल्टा व्हेरिएंटसोबत तुलना केल्यास त्यातील संक्रमण, प्रसार वेगही कमी आहे. २८१पैकी पहिली मात्रा घेतलेल्या केवळ आठ जणांनाच आणि दोन्ही मात्रा घेतलेल्या २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या सर्वच व्यक्तींना अतिदक्षता उपचार वा प्राणवायू पुरवठा आदी कोणत्याही उपायांची गरज भासलेली नाही. रुग्ण संख्या टक्केवारी वयोगट २६ ९ टक्के ० ते २० वर्षे ८५ ३० टक्के २१ ते ४० वर्षे ९६ ३४ टक्के ४१ ते ६० वर्षे ६६ २३ टक्के ६१ ते ८० वर्षे ८ ३ टक्के ८१ ते १०० वर्षे