'ओमिक्रॉन'शी लढण्यासाठी चौफेर रणनीती;महाराष्ट्र सरकारने उचलली 'ही' पावले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

'ओमिक्रॉन'शी लढण्यासाठी चौफेर रणनीती;महाराष्ट्र सरकारने उचलली 'ही' पावले

https://ift.tt/3riIU4Q
वृत्तसंस्था, नवी दिल्ली/ म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाचा अधिक वेग असलेल्या ''ची धास्ती वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. 'ओमिक्रॉन'चे संकट थोपवण्यासाठी आवश्यक रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. करोना काळात बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून पूर्ववत करण्याच्या निर्णयाचा केंद्र सरकार फेरविचार करणार असून चाचण्या, आरोग्य सुविधा वाढवण्याच्या तसेच दक्षता घेण्याच्या सूचना राज्यांना केल्या आहेत. तर करोनाच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला. मात्र, आता 'ओमिक्रॉन'चे आव्हान चिंता वाढवणारे असून त्याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये, यासाठी मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने काळजी घ्यावी. केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे आवश्यक आहे ते सर्व करा, निर्णय घेऊन आवश्यक पावले टाका, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी रविवारी प्रशासनाला दिले. आज, सोमवारी सकाळी १० वाजता राज्य होत असून त्यात आवश्यक तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे समजते. 'ओमिक्रॉन'ची चिंता लक्षात घेत राज्येही सतर्क झाली असून दुसऱ्या लाटेनंतर आलेली नियमांमधील शिथिलता दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. धोकादायक असलेल्या देशांमधून किमाक एक महिना विमानांना परवानगी देऊ नये, अशी मागणी दिल्ली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 'ओमिक्रॉन'च्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी बैठक घेत आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या निर्णयाचा फेरआढावा घेणार असल्याचे म्हटले. कडक निर्बंध, आवश्यक दक्षता, चाचण्या वाढवणे, प्रतिबंधित, धोक्याच्या ठिकाणांवर लक्ष, लसीकरणावर भर आणि आवश्यक आरोग्य सुविधांची सज्जता ठेवण्याच्या सूचना रविवारी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या. 'ओमिक्रॉन'ची प्रतिकारशक्तीवर मात करण्याची क्षमता अधिक असल्याने लशींची परिणामकारकता कमी दिसण्याची शक्यता असलचे 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. संसर्ग पुन्हा वाढू लागला तर लॉकडाउनसारखे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे परत लॉकडाउन लागू द्यायचा नाही, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीच लागतील. लशीच्या दोन मात्रा प्रत्येकाने घेणे आवश्यक असून विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. 'कुछ नही होता यार', असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे ते म्हणाले. 'ओमिक्रॉन'मुळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याविषयी ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. ऑडिट पूर्ण करा करोनाशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. 'ओमिक्रॉन' उंबरठा ओलांडून आला आहे का, हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठे कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत यासाठी अग्निसुरक्षा तसेच स्थापत्यविषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता जातीने पाहावे लागेल, असे ठाकरे म्हणाले. अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. करोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे, कोणते उपचार करावे हा नंतरचा भाग. पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र-आप्तेष्ट परदेशातूनही येतील. त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. लक्ष ठेवणे गरजेचे परदेशातून मोठ्या प्रमाणावर मुंबईत आणि इतर ठिकाणी ये-जा सुरू झाली आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमानसेवेने, रस्ते आणि रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चाचण्या वाढवा मुख्यमंत्र्यांनी यावेळी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व आणि चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले.'ओमिक्रॉन' ओळखू शकणारी चाचण्यांची किट राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले. तज्ज्ञांचा अभ्यास सुरू 'ओमिक्रॉन'ची संसर्ग क्षमता डेल्टापेक्षा कितीतरी अधिक आहे. डेल्टाची जागा 'ओमिक्रॉन'ने अवघ्या दोन आठवड्यांत घेतली, यावरून त्याची घातकता लक्षात येते, असे टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशी यांनी बैठकीत सांगितले. 'ओमिक्रॉन' सध्याच्या औषधांना, लशीला दाद देतो किंवा नाही, ते डॉक्टर आणि तज्ज्ञ जाणून घेत आहेत. पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. ६२ जणांना संसर्ग द्रक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये आढळून आलेल्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण असताना भिवंडी तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रमात केलेल्या तपासणीत १०९पैकी ६२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यातील ५५ ज्येष्ठ नागरिक असून ४१ जणांना सहव्याधी आहे. विशेष म्हणजे संसर्ग झालेल्यापैकी ५५ जणांनी दोन्ही लसमात्रा घेतल्या आहेत. या सर्व रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लशींची परिणामकारता तपासणे गरजेचे नवी दिल्ली : करोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होऊन तयार झालेल्या 'ओमिक्रॉन'च्या विरोधात लशींची परिणामकारकता तपासणे गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रविवारी व्यक्त केले.