जादूचा दिवा; शेअर बाजारात गुंतवणुकीपूर्वी करा पडत्या काळातील उजळणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

जादूचा दिवा; शेअर बाजारात गुंतवणुकीपूर्वी करा पडत्या काळातील उजळणी

https://ift.tt/3FYPEsq
केदार ओक, मुंबई : निमित्त काही का असेना पण अपेक्षित करेक्शन शेअर बाजारात आले आहे आणि येत आहे. ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५ आणि ‘निफ्टी’ने १८,२१० ही सर्वोत्तम पातळी दाखवल्यानंतर साधारण सात टक्के करेक्शन देऊन बाजार आता खाली आला आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी आदर्श पोर्टफोलिओ कसा असावा ते सांगणारा एक तक्ता दिला होता. तो गुंतवणूकदारांनी आता अमलात आणावा. आपल्या माहितीसाठी तो तक्ता पुन्हा देत आहे. त्याचबरोबर जे समभाग सुचवले होते तेही देत आहे, ज्यामुळे आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करणे सोपे जाईल. जर आपल्याकडे एक लाख रुपये असतील तर, त्यांचे टक्केवारीप्रमाणे कसे नियोजन करायचे ते देत आहे. अर्थात, आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन किंवा आपल्या क्षमतेनुसार निर्णय घ्यावा. माझ्या मते येत्या काही दिवसांत अजून बाजार खाली जाऊ शकतो. ‘सेन्सेक्स’ ५६,२००वर आणि ‘निफ्टी’ १६,२००वर जाईल, असा माझा अंदाज आहे. करोनाच्या नवीन आलेल्या प्रकारामुळे बाजारात घबराट पसरू शकते. त्यातच या नव्या प्रकाराचे घातक परिणाम दिसू लागल्यास ‘सेन्सेक्स’ ५४,००० ते ५२,००० आणि ‘निफ्टी’ १५,०००वर अशी वाईट परिस्थिती निर्माण निर्माण होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील वेळेस बाजार अचानक खाली आला होता. त्यामुळे त्यातील उसळीही जोरात होती. यावेळी बाजार हळूहळू खाली येतो आहे, त्यामुळे तो हळूहळूच वर जाईल. त्यामुळे मागील तेजीत पटकन पैसे किंवा फायदा मिळाला तसे या वेळी होईलच असे नाही, याची नोंद घ्यावी. या वेळी औषधे आहेत आणि लसीकरण बऱ्यापैकी झाले असल्यामुळे लाट आलीच तर, तीव्र येणार नाही असे जाणकार सांगत आहेत. आपल्या आरोग्याप्रमाणे पैसेही आपलेच आहेत. तेव्हा ते स्वतःच्या जबाबदारीवर व योग्य काळजी घेऊन गुंतवावेत. हाती असलेल्या पैशाची गुंतवणूक अशी करता येईल
क्षेत्र टक्के (विभागणी) गुंतवणूक कुठे करावी (कंपन्या)
बँकिंग, फायनान्स १६ अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक
डायव्हर्सिफाइड १५ गुजरात गॅस, लार्सन अँड टुब्रो, भारत फोर्ज, डेल्टा कॉर्प
फार्मा १२ ल्युपिन, अरविंद फार्मा, अजंता, वोकहार्ड, ग्लँड फार्मा
टेक्नॉलॉजी १४ टीसीएस, टेक महिंद्रा, अॅपटेक, मास्टेक
एफएमसीजी ११ टाटा कन्झ्युमर, गोदरेज कन्झ्युमर, मिस बेक्टर, गोदरेज अॅग्रो
इन्शुरन्स एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ
ऑटो १० मारुती, महिंद्र अँड महिंद्र, आयशर, टाटा मोटर्स
ऑइल, सिमेंट १५ क्रॉम्प्टन, हॅवेल्स, व्होल्टास, टाटा केमिकल, बीपीसीएल, पेट्रोनेट, अंबुजा