
कोल्हापूर : दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आलेली मेकॅनिकने ट्रायल घेण्यासाठी थेट डोंगरावर नेली. तीदेखील रात्री अकरा वाजता. घाटात जाताच गाडीचा ब्रेक लागेना म्हटल्यावर त्याने खाली उडी मारली आणि ही महागडी गाडी पुढे जावून दगडाला धडकली. दगडाला धडकताच कारने पेट घेतला आणि कार जळून खाक झाली. मेकॅनिकला ही ट्रायल चांगलीच महागात पडली असून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( ) वाचा: या घटनेची अधिक माहिती अशी, गोवा येथील यांची एमएच- १२ बीएक्स ४५४५ ही बीएमडब्ल्यू कार बिघडली होती. त्यामुळे त्यांनी ही महागडी कार येथील समीर मिस्त्री याच्याकडे दुरुस्तीसाठी दिली होती. तीन दिवसानंतर कारची दुरुस्ती झाल्यानंतर मेकॅनिकने ही कार ट्रायलसाठी सादळे मादळे घाटात नेली. तेथून परत येताना घाटात ब्रेक लागला नाही. त्यामुळे घाबरलेल्या मेकॅनिकने कारमधून बाहेर उडी मारली पण पुढे जावून गाडी मोठ्या दगडाला धडकली आणि कारने पेट घेतला. तातडीने अग्नीशमनची गाडी बोलविण्यात आली पण तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. यामुळे मेकॅनिकला महागड्या गाडीची ट्रायल फारच महागात पडली आहे. याबाबत ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाचा: दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत कोल्हापुरातील उंचगाव ते टेंबलाई मार्गावर बुधवारी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. दरम्यान मागून आलेला दुचाकी स्वार अमित कोराणे याने प्रसंगावधान दाखवत कारचालक जितेंद्र पटेल यांना कारमधून उतरवत त्यांचे प्राण वाचवले. त्यानंतर काही वेळातच ही कार जळून खाक झाली. चारचाकीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. दैव बलवत्तर म्हणून पटेल यांचा जीव वाचला. वाचा: