सोलापूर जिल्ह्यात लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 18, 2021

सोलापूर जिल्ह्यात लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला अटक

https://ift.tt/3qOGKto
: रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी तीन टक्के प्रमाणे १ लाख रुपये आणि नवीन काम मिळवून देण्यासाठी २६ हजार अशी एकूण १ लाख २६ हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी तक्रारदाराकडे रस्ता डांबरीकरण्याच्या कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या ३ टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत ज्या व्यक्तीकडे लाच मागण्यात आली त्याने ३० सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार २२ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता कारवाईमध्ये विश्वनाथ वडजे यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता डांबरीकरण्याचे कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांचे बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात १ लाख रूपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठी २६ हजार रूपये अशी एकूण १ लाख २६ हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी आणि १ नोव्हेंबर रोजी विश्वनाथ वडजे यांच्याविरूद्ध सापळा कारवाई आयोजित केली असता विश्वनाथ वडजे यांनी संशय आल्याने तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही. मात्र लाचेची मागणी करणाऱ्या वडजे यांच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. दरम्यान, ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, अविनाश सागर, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रितम चौगुले, संजय कलगुटगी, चालक बाळासाहेब पवार, पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.