तनिषा मुखर्जी करोना पॉझिटीव्ह, बॉलिवूडमधून पुन्हा समोर आले रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 28, 2021

तनिषा मुखर्जी करोना पॉझिटीव्ह, बॉलिवूडमधून पुन्हा समोर आले रुग्ण

https://ift.tt/3o19Vra
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी पॉझिटिव्ह आढळून आले. तनिषाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला करोनाची लागण झाल्याचे सांगितले. अलीकडच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. तनिषाच्या आधी उर्मिला मातोंडकर आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनाही करोनाची लागण झाली. तनिषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये लिहिले की, 'सर्वांना नमस्कार, मला करोनाची लागण झाली असून पुढील काही दिवस मी विलगीकरणात राहणार आहे.' तनिषा अशा काही कलाकारांपैकी एक आहे ज्यांनी करोना महामारीच्या काळातही काम केले होते. यावर्षी करोनाच्या दुसऱ्या लाटेत तिने लखनऊमध्ये एका सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. तनिषाने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'नील अँड निक्की', 'सरकार', 'सरकार राज' आणि 'टँगो चार्ली' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. सध्या, तनिषा तिच्या आगामी 'कोड नेम अब्दुल' या चित्रपटात काम करत आहे ज्यामध्ये ती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.