'मी बायसेक्शुअल नाही', नुसरतवर अजूनही प्रेम करतो निखिल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 28, 2021

'मी बायसेक्शुअल नाही', नुसरतवर अजूनही प्रेम करतो निखिल

https://ift.tt/3cWRVYU
मुंबई- बंगाली चित्रपटांची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची लोकसभा खासदार बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मग ते पती निखिल जैनपासून विभक्त होणे असो की अभिनेता यश दासगुप्तासोबतचे अफेअर आणि मुलाला जन्म देणं अशा एक ना अनेक कारणांमुळे ती चर्चेत असतेच. नुसरत जहांपासून विभक्त झाल्यानंतर आता पहिल्यांदाच याने उघडपणे आपलं मत मांडलं आणि नुसरतसोबतच्या नात्याबद्दल उघडपणे बोलला. व्यवसायाने व्यावसायिक असलेल्या निखिल जैनने Ei Samay Digital ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, तो अजूनही त्याची पूर्वाश्रमिची पत्नी नुसरत जहांच्या प्रेमात आहे. निखिलपासून वेगळं झाल्यानंतर नुसरतने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. यात निखिल बायसेक्शुअल असल्याचाही एक आरोप होता. मात्र, या मुलाखतीत निखिलने नुसरतचा बायसेक्शुअल असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. नुसरत जहांने निखिलशी जून २०१९ मध्ये बोर्दम, तुर्की येथे डेस्टिनेशन वेडिंग केले होते. मात्र, वर्षभरातच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. यानंतर नुसरत वेगळी झाली आणि तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. नुसरतने सांगितलं की, त्यांचं लग्न तुर्कस्तानमध्ये झालं असून विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांची नोंदणी भारतात झालेली नाही. त्यामुळे हा विवाह भारतात कायदेशीररित्या वैध नव्हता. यानंतर नुसरत जहां बंगाली चित्रपटांतील अभिनेता यश दासगुप्तासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. नुसरतने ऑगस्ट महिन्यात मुलाला जन्म दिला. या मुलाचे वडील असून नुसरतने मुलाचे नाव ठेवले आहे.