कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू: कुटुंबाने केला गंभीर आरोप; निलंबनाच्या भीतीने... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू: कुटुंबाने केला गंभीर आरोप; निलंबनाच्या भीतीने...

https://ift.tt/3ce8OxC
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. सरकारने वारंवार विनंती करूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांचा संप सुरूच आहे. या संपकाळात काही एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनाही घडल्या. अशातच आता भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द येथील एसटी कर्मचारी अनिल मारुती कांबळे यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. () अनिल कांबळे हे सावंतवाडी येथे एसटी चालक तसंच वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर कांबळे कुटुंबाने प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. 'एसटी संपात सहभागी असल्याने आपल्यावरही निलंबनाची कारवाई होईल या भीतीने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं आणि याच दबावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला,' असा दावा अनिल कांबळे यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून अनिल कांबळे यांनी तणावामुळे अन्नाचा कणही खाल्ला नव्हता, अशी माहितीही कुटुंबाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एका चालकाने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.