मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट?; रेल्वे पोलिसांना फोन, सुरक्षा वाढवली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट?; रेल्वे पोलिसांना फोन, सुरक्षा वाढवली

https://ift.tt/30rHrOy
मुंबई: मुंबई शहरात घडवले जाण्याची शक्यता असल्याची माहिती एका व्यक्तीने फोनवरून रेल्वे पोलिसांना दिली असून या फोनकॉलची गंभीर दखल घेत सर्व प्रमुख व अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याबाबत आयुक्त यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ( ) वाचा: वांद्रे रेल्वे पोलिसांना आज फोनवरून बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटाबाबत माहिती मिळाली. असल्याचे या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला संपर्क साधून अधिक माहिती घेण्यात आली आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व संबंधित यंत्रणांनाही याबाबत अवगत करण्यात आले असून शोधमोहीम सुरू करतानाच सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. वाचा: मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी याबाबत महत्त्वाचे ट्वीटही केले आहे. 'मुंबईत बॉम्बस्फोट घडवले जाण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला फोनवरून मिळाली आहे. संबंधित व्यक्तीशी आम्ही संपर्क साधला आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इतर सर्व यंत्रणांना आम्ही याबाबत कळवले आहे. फोनवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही कसून तपास करत आहोत. मात्र, घाबरण्याचे वा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही', असे कैसर खालिद यांनी नमूद केले. वाचा: