मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 28, 2021

मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म

https://ift.tt/3nYMcbp
मुंबई : कुर्ला येथील एका बंद इमारतीच्या टेरेसवर १९ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे कुर्ला परिसरात एकच खळबळ उडाल्याने पोलिसांनी देखील गंभीर दखल घेत अवघ्या काही तासांत या गंभीर गुन्हयाची उकल केली आहे. तरुणीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर रिझवान शेख आणि त्याचा मित्र फैजल शेख या दोघांना अटक केली आहे. कुर्ला पश्चिमेकडील एचडीआयएल कॉलनीमधील तेरा मजल्याच्या इमारत क्रमांक १६ च्या टेरेसवर या परिसरातील काही मुले गुरुवारी सायंकाळी टिकटॉक व्हिडीओ करण्यासाठी गेली. टेरेसवर दुर्गंधी येत असल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिले असता एक तरुणी मृतावस्थेत पडलेली आढळली. या मुलांनी पोलिस नियंत्रण कक्षाला मृतदेह सापडल्याची माहिती कळवली. पोलिस नियंत्रण कक्षाकडून समजताच विनोबा भावे नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरुणीचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. या तरुणीचे वय २० ते २५ वर्षे वयोगटातील असून डोक्यात मारून आणि गळयावर वार करून हत्या करण्यात आली. इतकेच नाही तर हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. या अहवालानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. तरुणीची ओळख पटली नसल्याने सर्व पोलिस ठाण्यातील बेपत्ता झालेल्या तक्रारींची माहिती घेतली. सर्व पोलिसांना या मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले आणि खबरे देखील कामाला लावले. तपासाकरिता पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी देवनार आणि कुर्ला परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. रिझवान शेख, फैझल शेख अशी या दोघांची नावे असून रिझवान आणि या तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. या तरुणीने लग्नासाठी रिझवानकडे तगादा लावला होता. लग्न करायचे नसल्याने रिझवान याने फैझल याला सोबत घेऊन या तरुणीची हत्या केल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.