मस्त बातमी! करोनाविषयक खबरदारीमुळे इतर आजारही झाले दूर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 13, 2021

मस्त बातमी! करोनाविषयक खबरदारीमुळे इतर आजारही झाले दूर

https://ift.tt/3n7K8gK
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हात वारंवार स्वच्छ धुणे, मास्क-सॅनिटायझरचा वापर अनिर्वाय ठरला. हे उपाय काहीसे जाचक वाटत असले, तरीही मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मात्र ते उपकारकच ठरले आहेत. या सवयींमुळे करोनाला प्रतिबंध होत असतानाच, कावीळ, गॅस्ट्रोसारख्या आजारांनाही आळा बसला आहे. या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी घट झालेली दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षांत गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत ८३ आणि काविळच्या रुग्णसंख्येत ६७ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विविध प्रकारचे निर्बंध, प्रतिबंधक उपायांवर भर देण्यात आला. त्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर आवश्यक ठरले. त्यामुळे दैनंदिन स्तरावर वावरताना अडचणी येत असल्या, तरीही मुंबईकरांना आरोग्याच्या दृष्टीने त्याचा फायदा झाला आहे. करोना नसताना स्वच्छतेची इतकी काळजी घेतली जात नव्हती. बाहेरच्या खाद्यपदार्थांवर उड्या पडायच्या. परंतु, करोनामुळे मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवण्याच्या सवयीने मुंबईकरांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे. एरवी या खबरदारीच्या अभावाने काविळ, गॅस्ट्रोसारख्या विकारांना बळी पडणाऱ्या मुंबईकरांची संख्या खूप मोठी होती. सध्या करोनाप्रतिबंधक नियमांचा अवलंब सुरू झाल्याने मुंबईत गेल्या दीड वर्षात गॅस्ट्रोचे रुग्ण ८३ टक्के तर कावीळचे रुग्ण ६७ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. साथीचे आजार नियंत्रणात केवळ कावीळ, गॅस्ट्रोच नव्हे इतरही काही आजार नियंत्रणात आले आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मलेरियाचे ७२ रुग्ण, - ४९, डेंग्यू ४७, हेपिटायटिस ६, चिकनगुनिया ६ लेप्टो १ आणि 'एच१एन१'चा १ रुग्ण आढळला आहे. त्यामागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे ५७६ रुग्ण, डेंग्यू - २५४, गॅस्ट्रो-२४७, हेपिटायटिस- ४१, चिकनगुनिया-३३, लेप्टो-३१, 'एच१एन१'चे ८ रुग्ण आढळले होते. तसेच गेल्या महिन्यात साथीच्या आजारामुळे एकाचाही मृत्यू ओढविला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.