संप मिटत नसल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली; नगरमध्ये घडली धक्कादायक घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

संप मिटत नसल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली; नगरमध्ये घडली धक्कादायक घटना

https://ift.tt/3rbWfvI
अहमदनगर : आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नगर जिल्ह्यातील आगारातील एका कर्मचाऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर नगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. संप आणि त्यातून आलेल्या तणावतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, यासंबंधी त्यांनी अधिकृतपणे तक्रार केलेली नाही. ( ) वाचा: एसटीच्या शेवगाव आगारात कार्यरत चालक (वय ४७ रा. लोहसर खांडगाव, ता. पाथर्डी) यांनी शनिवारी रात्री घरीच विषारी औषध घेतले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दगडखैर २००५ पासून एसटीच्या सेवेत आहेत. सध्या सुरू असलेल्या संपात ते सहभागी झाले. व्हावे, या मागणीवर ते ठाम आहेत. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. मात्र, यासंबंधी अधिकृतपणे तक्रार करण्यात आलेली नव्हती. यावर अधिक बोलण्यासही त्यांच्या मुलाने नकार दिला. वाचा: दगडफेकीत चालक जखमी घेण्यात आला असला तरी धूसफूस सुरूच असल्याचे दिसून येते. दुसऱ्या दिवशीही बसवर दगडफेकीची घटना घडली. रविवारी शेवगाव-नेवासा ही बस शेवगावकडे परतत असताना भानसहिवरा गावाजवळ समोरील बाजूने दगडफेक करण्यात आली. बसची काच फुटून एक दगड चालक दत्तात्रेय नारायण काकडे यांना लागला. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. शेवगाव येथील आगार प्रमुखांनी स्वतः काकडे यांना नगरमध्ये आणत रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप लबडे यांनी दिली. वाचा: