धडाकेबाज अर्धशतकासह रोहित शर्माने रचला विश्वविक्रम, जगातील कोणत्याही फलंदाजाला ही गोष्ट जमली नाही... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 22, 2021

धडाकेबाज अर्धशतकासह रोहित शर्माने रचला विश्वविक्रम, जगातील कोणत्याही फलंदाजाला ही गोष्ट जमली नाही...

https://ift.tt/3cBEGMU
कोलकाता : भारताचे कर्णधारपद स्विकारल्यापासून रोहित शर्मा अफलातून फॉर्मात आहेत. रोहितने या मालिकेत सलग दुसरे अर्धशतकही झळकावले. पण त्याचबरोबर रोहितने यावेळी एक विश्वविक्रमही रचला आहे. रोहितने जी गोष्ट करून दाखवली आहे, ती क्रिकेट विश्वात कोणत्याही फलंदाजाला जमलेली नाही. रोहितने कोणता विश्वविक्रम रचला, पाहा...रोहित शर्मा हा क्रिकेट विश्वात हिटमॅन या नावाने ओळखला जातो. या नावाला साजेसा विश्वविक्रम रोहितने या सामन्यात केल्याचे पाहायला मिळाले. आहे. रोहितने आता आंतराराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १५० षटकारांचा पल्ला गाठला आहे. त्याचबरोबर रोहितने आता कसोटी क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००पेक्षा जास्त आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १५०पेक्षा जास्त षटकार लगावण्याचा विश्वविक्रम रचला आहे, अशी कामगिरी करणारा रोहित हा क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १५०पेक्षा जास्त षटकार आता रोहित शर्माच्या नावावर झाले असले तरी तरी तो दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १५० षटकार झळकावण्याचा मान न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्तिलच्या नावावर आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून रोहितने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त षटकार लगावण्याचा पराक्रम केला आहे. हा पराक्रम करणारा भारताचा तो दुसरा कर्णधार ठरला आहे. कारण भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक ५९ षटकार हे विराट कोहलीच्या नावावर आहेत. जयपूर येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माने ४८ धावा केल्या होत्या. त्यावेळी रोहितचे अर्धशतक दोन धावांनी हुकले होते. पण ही कसर रोहितने त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये भरून काढली. रांचीतील दुसऱ्या सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावले, तर कोलकाताच्या सामन्यात रोहितने ५६ धावांची खेळी साकारली. रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हे लक्ष्य १७.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारतीय संघाला निर्भेळ यश संपादन करण्याची ही चांगली संधी आहे.