
इस्लामाबादः बॉलीवूड चित्रपट 'सूर्यवंशी' हा अनेकांना आवडला आहे. तर काहींनी चित्रपटाच्या आशयावर निशाणा साधला आहे. आता पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने 'सूर्यवंशी' चित्रपटावरून आरोप केला आहे. हा चित्रपट इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची ( girlfriend ) गर्लफ्रेंड असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मेहविशने बुधवारी एक ट्विट केले. अलिकडेच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट 'सूर्यवंशी' हा इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देणार आहे. हॉलीवूडमध्ये गोष्टी बदलत आहेत आणि आता सीमेपलीकडील लोक त्यांचे अनुसरण करतील, अशी आशा आहे. तुम्हाला नीट दाखवता येत नसेल, तर किमान मुस्लिमांचे चित्रण ज्या पद्धतीने केले जाते त्याबद्दल तरी निःपक्ष राहा. द्वेष नको बंधुभाव जपा', असे मेहविश ट्विटमध्ये म्हणाली. 'सूर्यवंशी'मध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. दाऊदपेक्षा २७ वर्षांनी लहान आहे मेहविश दाऊद पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असा दावा यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. ही बातमी समोर आल्याने दाऊद संतापला. हे गुपित जगजाहीर कसे झाली याचा तपास दाऊद करत असल्याचेही सांगण्यात येत होते. दाऊदपेक्षा २७ वर्षांनी लहान असलेला मेहविश ही त्याची सध्याची सर्वात मोठी कमजोरी असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. दाऊदच्या मदतीने मिळाले अनेक मोठे प्रोजेक्ट मेहविशला 'तमगा-ए-इम्तियाज' हा नागरी सन्मान दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हापासून म्हणजे गेल्या वर्षापासून ही चर्चा सुरू झाली होती. दाऊने मेहविशला एका आयटम साँगमध्ये बघितले होते. त्यानंतर दाऊदला तिची भुरळ पडली होती आणि यानंतर त्याने मेहविशला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे बोलले जाते. लोड वेडिंग, पंजाब नही जाउंगी आणि अॅक्टर-इन-लॉ या चित्रपटांमुळे मेहविशला प्रिसिद्धी मिळाली. मेहविशला कराचीतील एका प्रभावी व्यक्तीकडून मदत केली जात आहे. ज्याचे तहरीक-ए-इन्साफ पक्षाशी चांगले संबंध आहेत, असे नंतर बोलले जात होते. यानंतर ती व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद असल्याचा दावा करण्यात आला.