नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' चा ८३ वा एपिसोड आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या करोना व्हायरसच्या नव्या प्रकारामुळे संपूर्ण जगात टेन्शन आहे. आता पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे... - - माझ्यासाठी पद आणि पंतप्रधान पद हे सत्तेसाठी नाही, जनतेच्या सेवेसाठी आहेः पीएम मोदी - सर तुम्ही कायम सत्तेत राहवे यासाठी शुभेच्छा, असे प्रजापती मोदींना म्हणाले - आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेत राजेश प्रजापती यांच्यावर हृदयावर औषधोपचार. आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डने प्रजापतींना झाला फायदा. इतरांनाही योजनेची माहिती द्यावी, पीएम मोदींचे आवाहन - नैसर्गिक साधनसंपत्ती आपण वाचवायला हवी... यातच आपल्या सर्वांचे हित आहेः पीए मोदी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातून देशात सकारात्मक प्रवाह वाढतोयः पीएम मोदी - डिसेंबरमध्ये नौदल दिन, सैन्य दिवस देशात साजरा केला जातो. तसंच १६ डिसेंबरला १९७१ च्या युद्धातील विजयाची सुवर्ण जयंती देश साजरी करत आहेः PM मोदी - करोनाच्या नव्या वेरियंटने घाबरून जाऊ नयेः आयसीएमआर - ओमिक्रॉनचा संसर्ग अनेक देशांमध्ये पसरला - आफ्रिकेतील ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या वेरियंटमुळे अनेक देशांचे प्रवासावर निर्बंध - दक्षिण आफ्रिकेतील करोनाच्या नव्या वेरियंटमुळे जगभरात चिंता - संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार