नादियाः झाला आहे. या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीकडे जाणारा मॅटाडोर उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हंसखली भागात शनिवारी रात्री हा अपघात झाला. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मॅटाडोरमध्ये २० हून अधिक जण होते. दाट धुके आणि वेग जास्त असल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या मॅटाडोरमध्ये मृतदेह होता. सर्वजण स्मशानभूमिकाडे अंत्यसंस्कारासाठी चालले होते. अपघातातील जखमींना शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुके आणि गाडीचा वेग अधिक असल्याने हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.