परळी वैजनाथ, योगेश्वरी मंदिर उडविण्याची धमकी देणारा सापडला; केला धक्कादायक खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 1, 2021

परळी वैजनाथ, योगेश्वरी मंदिर उडविण्याची धमकी देणारा सापडला; केला धक्कादायक खुलासा

https://ift.tt/3D9XIFh
बीडः काही दिवसांपूर्वी परळीतील वैजनाथ मंदीर आरडीएक्सने उडवून देण्याचं धमकी पत्र आलं होतं. त्यानंतर लगेचच अंबाजोगाई योगेश्वरी मंदिरालाही धमकीचं पत्र आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. दोन मंदिरांना आलेले धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिस प्रशासनही सतर्क झाले होते. पोलिसांनी सतर्कतेने या सगळ्या घटनेची तपासणी करत असताना या घटनेला वेगळीच कलाटणी मिळालेली पाहायला मिळत आहे. आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे उदाहरण म्हणजे या दोन मंदिरांना आलेले पत्र. वैद्यनाथ मंदिर आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थान यांना थेट धमकीचे पत्र पाठवून खळबळ उडवून देणारा आणि ही उठाठेव प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून करणारा एक शिक्षक असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. वाचाः नांदेड येथील सिडको परिसरातील एक शिक्षक असणाऱ्या व्यक्तींने उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंग रामसिंग दक्खने यांना विक्री केली. पण याच शेतीच्या व पैशाच्या वादातून नंतर दोघांचे खटके उडाले व वितुष्ट आले. वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास या गुरुजींनी सुरुवात केली. कोणाचाही मृत्यू झाला अथवा आत्महत्या झाली तर त्यात रतनसिंग यांचे नावे घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा या गुरुजींनी लावला होता. ज्यात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस, नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस नांदेड, मांडवी, किनवट पोलीस, परळी वैजनाथ मंदिर, अंबाजोगाई मंदिरास पत्र व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. वाचाः दरम्यान, या प्रकरणी हा प्राथमिक तपासात पुढे आलेला संदर्भ असून पोलीस सखोल तपास करीत आहेत. या तपासातून मुळापर्यंतची कहाणी काही दिवसांतच पुढे येण्याची शक्यता आहे. वाचाः