'तारक मेहता..'मधील 'टप्पू'नं घेतला हा मोठा निर्णय; राज अनादकटच्या चाहत्यांना मोठा धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 12, 2021

'तारक मेहता..'मधील 'टप्पू'नं घेतला हा मोठा निर्णय; राज अनादकटच्या चाहत्यांना मोठा धक्का

https://ift.tt/3dGDd8G
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा कॉमेडी शो प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. कार्यक्रमाला मिळालेल्या तुफान लोकप्रियतेमुळेच हा कार्यक्रम तब्बल १३ वर्षे तो प्रसारित होत आहे. टीआरपीच्या लिस्टमध्ये हा कार्यक्रम कायमच अग्रस्थानी राहिला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये या कार्यक्रमात काही बदल झाले. काही कलाकारांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता त्यामध्ये आणखी एका कलाकाराचा समावेश झाला आहे. हा कलाकार आहे म्हणजे यांचा मुलगा टप्पूची भूमिका साकारणारा .. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमातच्या कुटुंबातून राज अनादकट बाहेर पडणार आहे. लवकरच तो त्याच्या वाटच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण करून सर्वांना अलविदा करणार आहे. राजने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ख्रिसमसच्या आधी पूर्ण करणार चित्रीकरण कार्यक्रमाच्या निकटच्या सुत्रांनी ई टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज कार्यक्रम सोडण्याचा विचार करत होता. त्याने ही गोष्ट प्रॉडक्शन हाऊसला देखील सांगितली होती. परंतु या गोष्टी चर्चेपर्यंत सीमित होत्या. राज याचे नवीन काँट्रॅक्ट होणार होते. परंतु शेवटच्या क्षणी हे काँट्रॅक्ट पुढे न नेण्याचा निर्णय अभिनेता आणि प्रॉडक्शन हाऊसने एकमताने घेतला. त्यानंतर या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय राजने घेतला. ख्रिसमसच्या आधी कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले जाणार आहे. या कलाकारांनी सोडला कार्यक्रम अलिकडेच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' कार्यक्रमातून नेहा मेहता, गुरुचरण सिंह हे बाहेर पडले आहेत. नेहाची जागा सुनैना फौजदारने घेतली आहे. तर गुरुचरणची जागा बरविंदर सिंह सुरीने घेतली आहे. आता या दोघांबरोबर राजा ही समावेश झाला आहे. राजने २०१७ मध्ये भव्य गांधी याची जागा घेतली होती. कार्यक्रमातील जेठालाल याचा मुलगा टप्पू ही भूमिका खूपच लोकप्रिय आहे. परंतु आता राज याला नवीन गोष्टी शोधायच्या असल्याने त्याने कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 'बबीता जी' सोबत झालेल्या अफेअरची चर्चा काही महिन्यांपूर्वी राज याचे नाव 'बबीता जी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्यासोबत जोडले गेले होते. या दोघांच्या अफेअर खूपच चर्चा झाली होती. यावरून खूप मीम्स ही व्हायरल झाले होते. दरम्यान, राजने या प्रकरणाचा खुलासा करत त्याची बाजू मांडली होती.