सेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपली; नारायण राणेंच्या 'त्या' भाषणावरुन वाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 12, 2021

सेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपली; नारायण राणेंच्या 'त्या' भाषणावरुन वाद

https://ift.tt/33od3pt
म. टा. खास प्रतिनिधी, केंद्रीय मंत्री यांच्या लोकसभेतील इंग्रजी भाषणाच्या व्हायरल व्हिडीओवरून आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात येत असून या टीकेला उत्तर म्हणून भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र शनिवारी दिवसभर पहायला मिळाले. दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी नारायण राणे यांच्या खात्यासंदर्भात बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकार कोणत्या योजना आणत आहेत, यासंदर्भात प्रश्न विचारले असता नारायण राणे यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल करण्यात येत असून यावरून शिवसैनिकांनी नारायण राणे यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी ही नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. लोकसभेमध्ये नारायण राणे यांच्यामुळे महाराष्ट्राची मान खाली गेली अशा शब्दात कायंदे यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मलासुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, अशा शब्दांत राऊत यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे. नितेश यांचा इशारा शिवसेनेच्या या टीकेला उत्तर देताना आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राज्यातल्या काही नेत्यांची जीभ जास्तच चालायला लागली आहे. पोलिसांचा गराडा बाजूला ठेवा मग जीभ कशी वापरायची ते दाखवून देऊ, असा इशाराही नितेश राणेंनी दिला.