जेव्हा असदुद्दीन ओवेसी ही म्हणतात, 'मी पुन्हा येईन'...; काय घडलं नेमकं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 12, 2021

जेव्हा असदुद्दीन ओवेसी ही म्हणतात, 'मी पुन्हा येईन'...; काय घडलं नेमकं?

https://ift.tt/3oLfIl6
औरंगाबादः मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी औरंगाबाद ते मुंबई असा काढण्यात आलेल्या मोर्च्याची सांगता चांदवलीच्या सभेनंतर झाली. या सभेत एमआयएम प्रमुख यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर याच वेळी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर बोलण्यासाठी मी पुन्हा येईन असेही म्हणाले. सकाळी ७ वाजता औरंगाबादहुन निघालेला मोर्चा अनेक नाट्यमय घडामोडींनंतर मुंबईत पोहचला. त्यानंतर सभेला ओवेसी यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले, की मुस्लीम आरक्षणाची लढाई आम्ही लढणारच. आता मोर्चा काढला होता, पण आगामी होणाऱ्या अधिवेशानात एमआयएमकडून विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्च्यात मला जर बोलवलं तर मी पुन्हा येईल, असं ओवैसी म्हणाले. वाचाः मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला टोला.... यावेळी बोलतांना ओवेसी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना, आम्ही मुंबईत येत आहोत म्हणून या सरकारने आम्हाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मुंबईत कलम १४४ लावण्यात आलं मग आम्ही विचारतो की आगामी काळात राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यावेळी सुध्दा कलम १४४ लावणार का? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असा टोला ओवेसी यांनी लगावला. वाचाः शिवसेना नेहमीच राष्ट्रवादाची घोषणा २४ तास देत असते. मात्र तिरंगा हीच तर राष्ट्रवादाची ओळख आहे हे शिवसेना विसरली आहे. हा तिरंगा घेऊन येणाऱ्या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा तिरंगा ही राष्ट्रवादाची ओळखही आहे आणि आमच्या कुर्बानीची कहाणी देखईल आहे. आमच्या जेष्ठांची निशाणीही आहे, असे सांगतानाच मला हे कळत नाही की आपण तिरंग्याच्या विरोधात कसे काय असू शकता?, असा सवालही ओवेसी यांनी विचारला.